BMC School : मुंबई महानगरपालिकेच्या शाळेंच्या राखीव खोल्यांची परस्पर विक्री
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंडळी, आजवर आपण शासनाच्या भूखंडांवर अतिक्रमण झाल्याचं किंवा त्यांची परस्पर विक्री करण्यात आल्याचं ऐकलं आहे. पण आता चक्क मुंबई महापालिकेच्या शाळेचे राखीव वर्गच खाजगी व्यक्तींना विकल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. धक्कदायक बाब म्हणजे या प्रकरणात बीएमसी अधिकारीच सामील असल्याचं निदर्शनास आलं आहे. याप्रकरणी बीएमसी अधिकाऱ्यांसह सहा व्यक्तींवर वरळी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरण फेब्रुवारी २०१९ साली उघडकीस आलं होतं. मुंबई महापालिकेकडून बीडीडी चाळीतील ६६ खोल्या शाळांसाठी भाडेतत्वावर घेण्यात आल्या आहेत. त्यातील बीडीडी चाळ क्रमांक ८४ आणि १०० मधील सहा खोल्या धोकादायक अवस्थेत असल्यानं, त्याठिकाणचे वर्ग बंद करण्यात आले. त्याचाच गैरफायदा घेऊन अधिकाऱ्यांच्या संगनमतानं खोटी कागदपत्रं वापरून या खोल्यांचं हस्तांतरण करण्यात आलं होतं.