Hotel Quarantine | क्वॉरंटाईनसाठी हॉटेल्सची मदत, मात्र हॉटेल मालकांना अद्याप पालिकेकडून पैसे नाहीत

लॉकडाऊनच्या काळात गेले मुंबईत तीन महिने कॉरंटाईन सेंटरच्या नावाखाली ताब्यात घेतलेल्या हॉटेल्सचं बिलं वसूल करण्यासाठी हॉटेल चालकांना आता पालिकेकडे तगादा लावावा लागतोय. दादरमधील शारदा रेसिडेन्सिचे व्यवस्थापक रतिश परब हे गेला महिनाभर यासाठी वॉर्ड ऑफिसच्या फेऱ्या मारतायत. पण अजूनही त्यांना एक रूपया सुद्धा मिळालेला नाही. याबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता, या गोष्टी त्यांच्याही कानावर आल्या असून पुढील आठवड्यात याबाबत त्यांनी संबंधित अधिका-यांची एक बैठक बोलावली आहे. कठीण काळात पालिकेला मदत करणाऱ्या व्यावसायिकांवर अन्याय होऊ देणार नाही, असं महापौरांनी सांगितलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola