College Admission Procedure | अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचं नवं वेळापत्रक,पाहा कसा भरावा अर्ज

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचं पुन्हा एकदा सुधारीत वेळापत्रक जाहीर झाले असून  उद्यापासून ( 26 जुलैपासून )विद्यार्थ्यांना लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळणार आहे.  तर 1 ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना अकरावी ऑनलाइन प्रवेश अर्जाचा भाग 1 भरता येणार  आहे. राज्यातील मुंबई महानगर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या विभागात अकरावीची प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. मात्र सदर प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी आणि पालकांना अद्याप पुरेशी जागृती झालेली नसल्याने या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग 1 भरण्याची तारीख पुढे ढकलली आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार उद्यापासून अर्जाचा भाग 1 भरायचा होता मात्र आता हा अर्ज 1 ऑगस्टपासून विद्यार्थी भरू शकणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola