
Amruta Fadnavis : देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यातून कुणी केली अनिक्षा जयसिंघानीची मदत?
Continues below advertisement
अमृता फडणवीस यांना एक कोटींची लाच ऑफर केल्याप्रकरणी आणखी माहिती समोर येत आहे. आरोपी अनिक्षा आणि तिचे वडील अनिल जयसिंघानी हे सतत संपर्कात होते. अनिक्षानं अमृता यांना दोेन व्हिडीओ पाठवले होते.. त्याला अमृता यांनी उत्तर दिल्यावर त्याचे स्क्रीनशॉट अनिक्षानं लगचेच वडिलांना पाठवले. अधिक महत्त्वाची बाब म्हणजे, अनिक्षानं सागर बंगल्यात एक बॅग पोहचवल्याचा व्हिडीओ अमृ़ता फडणवीसांना पाठवला होता. हा व्हिडीओ सागर बंगल्यात कुणी शूट केला, याचा शोध पोलीस घेत आहेत.. अनिक्षानं दोन लोकांची नावं सांगितली, मात्र त्या दोघांनी याच्याशी आपला काहीही संबंध नसल्याचं सांगितलं.
Continues below advertisement