Mumbai Traffic Jam Potholes : मुंबईतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर टोल भरुनही खड्डे, प्रवासी संतप्त
मुंबईमध्ये पावसामुळे झालेल्या रस्त्यांची झालेली अवस्था दाखवली.. मात्र मुंबईपाठोपाठ पुण्यातही सारखंच चित्र निर्माण झालंय. या खड्ड्यांमुळे पुणे-बेंगलोर महामार्गावरील पुण्यातील वारजे पुलावर सतत वाहतूक कोंडी होते. दोन्ही बाजूंनी इथं तासंतास वाहनांच्या रांगा लागत असतात. त्यामुळे प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. तर मुंबईतल्या प्रमुख रस्त्यांवर खड्यांमुळे तासंतास लोकांना प्रवासात अडकुन पडावं लागतयं.. त्यामुळे आता या खड्ड्यांच्या मुद्द्यावर तोडगा निघणार का हेही पहावं लागणार आहे.