Gauri Poojan पारंपरिक पद्धतीने गौरीचं पूजन, गौराची माझी लाडाची गं! वासुदेवासोबत गणेशोत्सवाचा आढावा

Continues below advertisement

तळकोकणात गणेशोत्सव आगळा वेगळा असतो. इथे अनेक रूढी प्रथा परंपरा पहायला मिळतात. अशीच एक प्रथा म्हणजे गौरीला वडे सागोतींच्या नैवैद्याची. गणपती बाप्पा शुद्ध शाकाहारी आहे. त्यामुळे त्याला नेहमी अकरा दिवस शुद्ध शाकाहारी नैवैद्य द्यावा लागतो. मात्र त्याच्याच शेजारी बसलेल्या गौरीला मात्र मटणाचा नैवैद्य द्यावा लागतो. गौरी ही माहेरवाशीण समजली जाते. तळकोकणात माहेरवाशीण माहेरी आल्यानंतर घरात तिखट जेवण केलं जातं. अगदी तसंच गौरीला माहेरवाशीण मानून तिला हा नैवेद्य देतात. आज सोमवार असला तरी ज्या घरात ही प्रथा आहे त्या घरात मटण शिजवलंच जात. अशा अनेक प्रथा परंपरांनी तळकोकणातला गणेशोत्सव साजरा होता म्हणूनच त्याचा एक वेगळाच गणेशोत्सव आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram