Maharashtra: बेशिस्त वाहनचालकांना वाहतूक नियमांचं उल्लंघन महागात पडणार ABP Majha
आता बेशिस्त वाहनचालकांना वाहतुकीचे नियम मोडणं महागात पडणार आहे. भरमसाठ दंडाची तरतूद असलेल्या नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रातही करण्याचा निर्णय परिवहन विभागानं घेतलाय. त्यानुसार आता बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्या आणि वाहन चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या दुचाकीस्वारांना एक हजाराचा दंड होणार आहे.