#UNLOCK राज्यात पॉझिटिव्हिटी दर कमी असलेल्या भागात निर्बंध शिथिल करण्याच्या हालचाली सुरू, दोन दिवसात निर्णयाची शक्यता

Continues below advertisement

मुंबई : राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून कमी होत आहे. आज 4,877 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 11 हजार 077 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 60 लाख 46 हजार 106 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.43 टक्के आहे. 

 

राज्यात आज 53 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.09 टक्के झाला आहे. तब्बल 44 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या  88 हजार 729रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जालना (43), हिंगोली (57), यवतमाळ (9), गोंदिया (60), गडचिरोली (61) या पाच जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15, 550 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

 

 धुळे, नंदुरबार, अकोला, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर  महानगरपालिका क्षेत्रात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर साताऱ्यात सर्वाधिक 561 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4, 69,95, 122 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,69, 799 (13.434 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,01,758 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,518व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram