TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 4 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 4 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. मराठीसोबतच पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा.
मराठी हा भारताचा अभिमान. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल मराठी माणसांचे अभिनंदन. देशाच्या सांस्कृतिक इतिहासात मराठीचं मोठ योगदान. पंतप्रधान मोदींची एक्स पोस्ट.
माझा मराठाचि बोलु कौतुके।
परि अमृतातें ही पैजा जिंके ॥
समस्त मराठी जनांचे हार्दिक अभिनंदन!!! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक्स पोस्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे मानले आभार.
माय मराठीच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली माय मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उद्धारासाठी आम्ही प्रयत्नशील आणि कटिबद्ध. नितीन गडकरी यांची एक्स पोस्ट.
मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांचे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीनं आभार. देवेंद्र फडणवीसांची एक्स पोस्ट.