Mahayuti Goverment : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांसह युतीचे नेते राजभवनात, सत्ता स्थापनेचा दावा

Continues below advertisement

Mahayuti Goverment : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांसह युतीचे नेते राजभवनात, सत्ता स्थापनेचा दावा
राज्यात सत्तास्थापनेच्या हालचाली गतिमान झाल्या असून महायुतीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची समजूत काढली जात आहे. त्यातच, भाजपचे केंद्रातील वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे, असे एकनाथ शिंदे यांनी गुरुवारीच जाहीर केलं आहे. तर, अजित पवारांनीही भाजपला आमचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे, भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा (Chief Minister) मार्ग मोकळा झाला असून आता उपमुख्यमंत्रीपदी शिवसेना शिंदे गटातून कोणाची वर्णी लागणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच, भाजप मुख्यमंत्र्‍यांसह गृहंत्रीपद देखील स्वत:कडेच ठेवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे, एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेकडे वजनदार कोणतं खातं राहिलं, याची देखील उत्सुकता शिवसेना आणि महाराष्ट्रातील आमदारांना आहे. दरम्यान, राज्याचं अर्थमंत्रीपद हे अजित पवारांकडेच राहिल, अशी सूत्रांची माहिती आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram