TOP 80 : 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 15 Sept 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविरोधकांनी मला पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, नागपुरात पत्रकारांच्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा गौप्यस्फोट.
पंतप्रधान होणं हा माझ्या आयुष्याचा उद्देश नाही, तर विरोधी पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांकडून पंतप्रधानपदाचा प्रस्ताव आल्याचाही नितीन गडकरींकडून दावा.
मी भाजपमध्ये जाणार नाही, मी काँग्रेसमध्येच राहणार, 'मी विकासकामासाठी नितीन गडकरींना भेटलो, यात राजकीय चर्चा नाही', काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे यांचं स्पष्टीकरण..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत धनगर आंदोलकांची आज मुंबईत सह्याद्री अतिथी गृहावर बैठक. या बैठकीत धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्याची प्रमुख मागणीवर तोडगा काढण्याची शक्यता
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज धुळ्याच्या शिंदखेडा दौऱ्यावर, सकाळी एस. एस. व्ही. पी. एस. महाविद्यालयाच्या मैदानावर शेतकरी मेळाव्यात राहणार उपस्थित
उद्धव ठाकरे आज अहमदनगर जिल्हा आणि संभाजीनगरच्या दौऱ्यावर, सकाळी शिर्डीत साईबाबा दर्शनापासून सुरूवात करत अनेक कार्यक्रम आणि मेळाव्यांना हजेरी लावणार.