TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 14 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 14 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
राज्यातील लक्षवेधी लढती आणि जिल्ह्यांपैकी एक असलेल्या बीड जिल्ह्यातील निवडणुकांकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. बीड (Beed) जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी पारंपरिक लढती होत असून परळी आणि माजलगाव मतदारसंघाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मराठा आरक्षण आणि उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचा शब्दा जिल्ह्यात प्रमाण मानला जात आहे, त्यामुळे येथील मतदारसंघात कोणता उमेदवार निवडून येणार, कोणता उमेदवार पडणारे याची चर्चा जिल्ह्यात आहे. कारण, परळी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे मैदानात आहेत. तर, माजलगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash solanke) हे स्वत: निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या निवडणूक प्रचाराच्या मुद्द्यांमध्ये त्यांनी आरक्षण चळवळीच्या लढ्यावेळी आपलं घर जाळण्यात आल्याची आठवण सांगितली. तसेच, मी कोणाच्याही नावाने तक्रार केली नाही, असेही ते म्हणाले.