TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 21 डिसेंबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 21 डिसेंबर 2024 : ABP Majha

मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक, ठाणे – कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर  ब्लॉक घेण्यात येणार. 

पश्चिम रेल्वे मार्गावर वसई रोड ते भाईंदर स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रात्रकालीन ब्लॉक, आज रात्री १२.३० ते पहाटे ४ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार.

ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ब्लॉक. ब्लॉक कालावधीत पनवेल ते ठाणे आणि ठाणे ते वाशी/नेरुळ/पनवेल मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात येणार

पूर्व द्रुतगती महामार्ग ते बीकेसी प्रवास अतिवेगवान होणार,बीकेसी कनेक्टर’खालून जाणारा १८० मीटर लांबीचा रस्ता पूर्ण, सोमवारपासून मार्ग सेवेत येणार, 

नव्या वर्षात केंद्र सरकार एफएसआय क्षेत्र निर्देशांक शुल्कावर तब्बल १९ टक्के जीएसटी लागू करणार, परिणामी घरांच्या किमती १० टक्क्यांनी वाढू शकतात.

विविध पुलांच्या गर्डर लाँचिंगसाठी शनिवारी आणि रविवारी मध्य रेल्वेवर ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक, एक्स्प्रेसचे मार्ग बदलले जाणार असून काही उपनगरीय सेवा रद्द करण्यात येणार 

मिरा भाईंदर पालिका आयुक्तांच्या नावाने पैशांची मागणी करणारे संदेश व्हायरल, आयुक्त संजय काटकरांकडून प्रकाराचे खंडन, तर अशा संदेशांना बळी न पडण्याचं आवाहन.

महाबळेश्वरातील पाचगणी, भोसेखिंड परिसरातील अतिक्रमणावर हातोडा, अनाधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात, वाई प्रांताधिकारी यांच्या नेतृत्वाखाली चार टिम दाखल

'मुंबई सेंट्रल'मधून एसटीच्या फेऱ्यांमध्ये कपात, मुंबई सेंट्रल बस स्थानक परिसराच्या काँक्रीटीकरणाचं काम २३ डिसेंबरपासून सुरू होणार, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी परळ, दादर आणि कुर्ला बस स्थानकातून बस सोडण्यात येणार.

रेल्वेच्या यूटीएस अॅपवरून अनारक्षित तिकीट काढल्यावर मिळणार तीन टक्के बोनस,  यापूर्वी आर वॉलेटच्या रिचार्जवर तीन टक्के बोनस जमा होत होता. 

मुंबईची हवा अत्यंत खराब झाली असून आणीबाणीची स्थिती निर्माण, उच्च न्यायालयानेे व्यक्त केली चिंता, वाहतूककोंडीमुळे हवेची गुणवत्ता खालावली, न्यायालयाचं निरीक्षण.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram