TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 14 June 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 14 June 2024 : ABP Majha
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या भागात मध्यम ते हलक्या पावसाच्या सरी पडतील अशी शक्यता आहे.
विदर्भात पावसाचा यलो अलर्ट, पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता.
परवा झालेल्या पावसानंतर हिंगोली जिल्हयात पेरणीच्या कामांना वेग, हळद, सोयाबीनसह कापसाच्या लागवडीचं काम सुरू.
100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, कृषी केंद्रावर लक्ष ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पथकांची नियुक्ती. हिंगोलीचे कृषी अधीक्षक राजेंद्र कदम यांची माहिती.
दमदार पाऊस होऊनही हिंगोलीत पाणीटंचाई कायम.. पावसाळा सुरु होऊनही जिल्ह्यात १० टँकरने पाणीपुरवठा..
मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबई-अहमदबाद महामार्गाची अक्षरशाह चाळण, वाहतूक कोंडीसह चिखलातून मार्ग काढताना वाहनचालक हैराण.