TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 09 जानेवारी 2025 : ABP Majha
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 09 जानेवारी 2025 : ABP Majha
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज एक महिना पूर्ण, या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल, आतापर्यंत दीडशे जणांची चौकशी.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांकडून खळबळजनक फोटो पोस्ट, हाके आणि वाल्मिक कराड यांचा एकत्र जेवतानाचा फोटो पोस्ट.
सामाजित कार्यकर्त्या अंजली दमानियांकडून आणखी एक फोटो एक्सवर पोस्ट, लक्ष्मण हाके आणि कैलास फडचा फोटो पोस्ट.
अंजली दमानियांकडून वेंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेसचं स्टेटमेंट शेअर, राजश्री मुंडे, अभय मुंडे, राजेंद्र घनवट,वाल्मिक कराडचं स्टेटमेंटमध्ये नाव, अजूनही म्हणता संबंध नाही? दमानियांचा सवाल.
अंजली दमानियांकडून मराठा, ओबीसी वादात तेल टाकण्याचं काम, अमोल मिटकरींचा आरोप.
अंतरवाली सराटीत गोळीबार झाला, तेव्हा धसांना गँग दिसल्या नाहीत? सुरेश धस हे फक्त देशमुखांच्या हत्येचे राजकारण करतायत, देशमुखांच्या हत्येला जातीचा रंग दिला जातोय,लक्ष्मण हाकेंचा आरोप.