Sandeep Kshirsagar Dharashiv Speech : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्याशिवाय शांत बसणार नाही
Sandeep Kshirsagar Dharashiv Speech : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्याशिवाय शांत बसणार नाही
स्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये आज जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा, या मागणीसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे, या मोर्चासाठी संभाजी राजे छत्रपती, मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार संदीप क्षीरसागर, नरेंद्र पाटील, देशमुख कुटुंबिय उपस्थित आहेत. धाराशिव शहरातील राजमाता जिजाऊ चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली आहे.
दरम्यान, हत्या प्रकरणातील आरोपींवर मोक्का अंतर्गत (MOCCA)कारवाईवर आमदार संदीप क्षीरसागर समाधानी नाहीत. या प्रकरणाचा मास्टर माईंड वाल्मिक कराड आहे. त्याला सहआरोपी करा ही मागणी त्यांनी पुन्हा केली आहे. तसेच धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधलाय. सात आरोपींवरती मोक्का लावलाय, पण वाल्मिक कराडवर मोक्का (MOCCA)लागला पाहिजे. वाल्मिक कराड याचे नाव 302 मध्ये टाकून त्याला सह आरोपी केलं पाहिजे. एखाद्या आरोपाला व्हीआयपी सारखी ट्रीटमेंट दिली जाते. धनंजय मुंडे यांनी स्वतः सांगितले आहे की तो माझा निकटवर्ती आहे. मग केवळ त्यामुळे त्यांना अशा पद्धतीने वागणूक दिली जातेय का? एखादा आरोपी सरेंडर होताना स्वतःच्या गाडीतून येतो हे राज्यातील पहिली केस असावी, असा घणाघात आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी केला आहे.