TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 13 सप्टेंबर 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेवेंद्र फडणवीस यांच्या घरातील बाप्पाच्या दर्शनासाठी आमदार, खासदार आणि मंत्र्यांची रीघ, मतदारसंघातील अंतिम टप्प्यातील कामे तात्काळ मार्गी लावा, महायुतीतल्या नेत्यांबद्दल बोलणं टाळा, फडणवीसांचा सल्ला.
आगामी विधानसभेसाठी महाविकास आघाडीचं १२७ जागांवर एकमत, त्यातील काँग्रेसचा ५५ जागांचा मार्ग खुला, तर उर्वरित जागा वाटपासाठी पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा बैठक होणार.
शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने विधानसभेसाठी मुंबईत ७ जागांची मागणी, यात अंधेरी पश्चिम, वर्सोवा, कुर्ला, अनुशक्ती नगर, दहिसर, घाटकोपर पूर्व आणि घाटकोपर पश्चिम या जागांचा समावेश, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईचे युवकचे अध्यक्ष अमोल मातेले यांची माहिती.
केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात येणार, विधानसभा निवडणूक घोषित करण्यापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक राज्याचा आढावा घेणार.
राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजपच्या माजी आमदार तरविंदरसिंह मारवा यांच्याविरोधात आज काँग्रेसचं राज्यभर आंदोलन, सर्व जिल्हा मुख्यालय काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन करावं, प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे निर्देश.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात जालन्यात भाजपकडून आज आंदोलन, शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर निषेध आंदोलन