Top 25 Superfast News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 03 Dec 2024 : 6 PM

Continues below advertisement

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा मार्ग जानेवारीत मोकळा होण्याची शक्यता, ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका रखडल्या. २२ जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार. 

मुंबईच्या गिरगावात मारवाडीत बोल असा हट्ट धरणाऱ्या दुकानदाराला मनसेकडून चोप, भाजपचं सरकार आल्याने मारवाडीत बोलण्याचा हट्ट धरल्याचा दावा.

इंदापूरमधील शहा गावच्या पायथ्याशी भीमा पात्रात सोडले १२ लाख मस्त्यबिज, राज्य सरकारचा उपक्रम, उजनी जलाशय मत्स्य व्यावसायिकांना मोठा दिलासा. 

कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये निवृत्त शिक्षकांसोबतच डीएड, बीएड बेरोजगारांची भरती.  यासाठीची प्रक्रिया जिल्हा आणि विभागीय शिक्षण स्तरावर सुरू. 

थर्टी फर्स्टआधी मुंबईतील हॉटेलांचं फायर ऑडीट करुन घेण्याच्या पालिकेच्या सूचना, मुंबईतील सर्व हॉटेलची पालिकेच्या अग्निशमन दलाकडून झाडाझडती घेतली जाणार.

मुंबई गोवा महामार्गावरच्या परशुराम घाटात पुन्हा अपघात, कंटेनर, टेम्पो आणि बसचा अपघात, 10 जण जखमी, काही काळ घाटातील वाहतुकीचा खोळंबा. 

नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील तुळजापूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचं काम अद्याप अपूर्ण, मात्र तरीही पार्टी जवळील टोलनाक्यावर टोल वसुली, त्यामुळे नागरिकांकडून रोष व्यक्त. 

आग्रातील ताजमहाल बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पर्यटन विभागाकडे आला धमकीचा ई-मेल, CISFचं पथक अलर्ट मोडवर, तपासणी सुरू.

केरळमध्ये झालेल्या भीषण अपघातात ५ वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा मृत्यू.  विद्यार्थी प्रवास करत असलेल्या कारची केरळ राज्य परिवहन महामंडळाच्या बसला जोरदार धडक बसल्यानं झाला अपघात. केरळच्या अलाप्पुझा येथील घटना. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram