Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 7 AM : 21 डिसेंबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :  7 AM : 21 डिसेंबर 2024 : ABP Majha

शरद पवार आज बीड, परभणी दौऱ्यावर, बीडमधील देशमुख  कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेणार. तर परभणीत सूर्यवंशी यांच्या कुटुंबासह धरणे आंदोलनस्थळी सुद्धा शरद पवार भेट देणार

बीडमधील हत्येचं समर्थन कोणीच करत नाही, तपास सुरू आहे, दुध का दुध पानी का पानी होईल, धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया.  

संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईवर त्यांच्या कुटुंबीयांकडून नाराजी व्यक्त, बीडच्या एसपींना नोकरीतून बडतर्फ करा,  देशमुख कुटुंबीयांची मागणी.

परभणी घटनेच्या निषेधार्थ आज जालना जिल्हा बंदची हाक. कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यवहार बंद राहणार.शेतकऱ्यांनी आज शेतीमाल विक्रीला न आणण्याचं समितीच्या सचिवांचं आवाहन

संजय राऊत यांच्या घराची रेकी करणारे खासगी कंपनीचे कर्मचारी असल्याची पोलिसांची माहिती. मोबाईल नेटवर्कच्या तपासणीसाठी कर्मचाऱ्यांच्या परिसरात फेऱ्या.

कल्याण खडकपाडा पोलिसांनी अखिलेश शुक्ला याची खाजगी गाडी जप्त केलीय. गाडीमधून अंबर दिवा देखील पोलिसांकडून हस्तगत .

कल्याण मारहाण प्रकरणी अखिलेश शुक्ला पोलिसांच्या ताब्यात. शुक्ला टिटवाळा परिसरात फिरत होता, एकूण तीन जण ताब्यात. पोलिसांची माहिती.

अखिलेश शुक्ला यांचं निलंबन. मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत माहिती. शुक्ला आणि त्याच्या पत्नीवरही गुन्हा दाखल. जे माज करतात त्याचा माज उतरल्याशिवाय शांत बसणार नाही, फडणवीसांचं वक्तव्य.

अधिवेशन संपल्यानंतर खातेवाटप होण्याची शक्यता,नाराजीनाट्य उफाळून येऊ नये यासाठी महायुतीचा सावध पवित्रा, २३ तारखेला मंत्री संभाव्य खात्यांचा घेऊ शकतात चार्ज, सूत्रांची माहिती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram