Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 07 AM : 05 जुलै 2024: ABP Majha

वानखेडे स्टेडियमवर विश्वविजेत्या टीम इंडियाचा सत्कार सोहळा, सत्कारावेळी वानखेडे स्डेडियमवर  हजारो क्रिकेटप्रेमींची गर्दी.  

रोहीत शर्माचे आईवडील गुरुनाथ शर्मा आणि पूर्णिमा शर्मा यांची वानखेडे स्टेडियमवर सत्कारसोहळ्याला हजेरी, रोहितनं सत्कारानंतर घेतली आई-वडीलांची भेट.

विश्वचषक जिंकल्यानंतर मी खूश, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माची वानखेडे स्टेडियमवरील सत्कारानंतर मराठीतून प्रतिक्रिया.

विश्वविजेत्या टीम इंडियातील मुंबईच्या ४ खेळाडूंचा आज विधिमंडळात सत्कार होणार, कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वालचा विधिमंडळातील सेंट्रल हॉलमध्ये होणार सत्कार.

विश्वविजेत्या टीम इंडियाची मुंबईत खुल्या बसमधून विजयी परेड, चाहत्यांची मोठी गर्दी.

मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर भारतीय क्रिकेट संघांचं स्वागत करण्यासाठी मुंबईकरांची प्रचंड गर्दी. गर्दीत मुंबईकरांनी दाखवली माणुसकी, एका रुग्णवाहिकेला जाण्यासाठी दिली जागा.

तिरंगा असलेल्या गाड्यांनी विमानतळावर क्रिकेट टीमच्या विमानाचं स्वागत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola