Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 10 AM : 26 ऑगस्ट 2024: ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर, आदित्य ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलसमोर भाजप कार्यकर्यांचं आंदोलन, यावेळी भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज, आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज.
आदित्य ठाकरेंविरोधात भाजप कार्यकर्यांची जोरदार घोषणाबाजी, पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात.
महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात आज हॉटेल ट्रायडेंटमध्ये महत्वाची बैठक, मुंबईतील जागांसंदर्भात आजच्या बैठकीत अंतिम निर्णयाची शक्यता.
येत्या विधानसभा निवडणुकीत तरुण आणि तरुणींना जागावाटपात प्राधान्य दिलं जाणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती.
अनिल देशमुख फडणविसांविरोधात लढत असल्यास आमचा पाठिंबा, आमदार रोहित पवार यांचं वक्तव्य.
पक्ष सांगेल तिथून निवडणूत लढणार, देवेंद्र फडणवीसांविरोधात निवडणूक लढणार का या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देतांना अनिल देशमुखांचं वक्तव्य,.
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवारांना धक्का, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर राळेभात यांचा राजीनामा, रोहित पवारांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून राजीनामा, राळेभात यांचं स्पष्टीकरण.