TOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 14 June 2024 : ABP Majha
TOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 14 June 2024 : ABP Majha
परवा झालेल्या पावसानंतर हिंगोली जिल्हयात पेरणीच्या कामांना वेग, हळद, सोयाबीनसह कापसाच्या लागवडीचं काम सुरू.
100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये,
कृषी केंद्रावर लक्ष ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पथकांची नियुक्ती. हिंगोलीचे कृषी अधीक्षक राजेंद्र कदम यांची माहिती
दमदार पाऊस होऊनही हिंगोलीत पाणीटंचाई कायम.. पावसाळा सुरु होऊनही जिल्ह्यात १० टँकरने पाणीपुरवठा..
मुंबई-गोवा महामार्ग पावसामुळे चिखलमय, काम अर्धवट असल्याने चिखलातून वाहनधारकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास, अपघात होण्याची शक्यता.
रात्री उशीरा मुख्यमंत्र्यांकडून कोस्टल रोडची पाहणी, मरीन लाईन्सपासून मुख्यमंत्र्यांनी केली पाहणीला सुरुवात.
खासदार संदिपान भुमरे आणि मंत्री शंभुराज देसाईंच्या शिष्टाईला यश, सहाव्या दिवशी अखेर मनोज जरांगेंकडून उपोषण स्थगित.
मनोज जरांगेंकडून सरकारला १ महिन्याचा म्हणजे १३ जुलैपर्यंतचा वेळ, ओबीसीतून मराठ्यांना हक्काचं आरक्षण द्या, जरांगेंची सरकारकडे मुख्य मागणी.