'राज्य सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणेला बदनाम करायचं काम', Sudhir Mungantiwar यांची टीका

Continues below advertisement

महाराष्ट्राच्या राजकारणासाठी हा एक दुर्दैवी दिवस आहे दुर्दैवी कालावधी आहे. ज्या युवकावर ड्रग्सचा आरोप आहे, त्याला वाचवण्यासाठी तुम्ही सगळी सरकारी शक्ती लावताय, ज्या आरोग्य विभागाच्या उमेदवारांनी परीक्षा देताना झालेल्या समस्या बाबत मत मांडलं त्याच्याबाबत एकाचाही तोंडातून शब्द निघत नाही.. केंद्रीय तपास यंत्रणेला बदनाम करायचं आपण केलेले गुन्हे लपविण्यासाठी हा एक सोयीस्कर मार्ग यांनी निवडलेला आहे, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram