Sangli BJP MP : भाजपचा खासदार असल्यानं ईडी मागे येणार नाही : संजयकाका पाटील
Sangli News : सध्या महाविकास आघाडीतल्या वेगवेगळ्या नेत्यांमागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. मात्र मी भाजपचा खासदार असल्यानं ईडी मागे लागणार नाही, असं वक्तव्य सांगलीचे भाजप खासदार संजय काका पाटील यांनी केलं आहे. तसंच आम्हाला लोकांसमोर दिखावा करावा लागतो. कर्ज काढून 40 लाखांच्या गाड्या वापराव्या लागतात, असंही संजयकाका पाटील म्हणाले आहेत. विटा शहरामध्ये एका कार्यक्रमात खासदारांनी केलेल्या या वक्तव्यामुळं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.