Thackeray Group BMC Morcha : महापालिकेतील कथित भ्रष्टाचाराविरोधात ठाकरे गट आक्रमक Abp Majha

आज ठाकरे गटाचा (Thackeray Group) मुंबई महापालिकेवर (Brihanmumbai Municipal Corporation) धडक मोर्चा निघणार आहे. या मोर्चाला स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उपस्थित राहणार आहेत. राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचं सरकार (Maha Vikas Aghadi) गेल्यानंतर मुंबई महापालिकेत (BMC) मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून सातत्यानं करण्यात आला आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या नेतृत्वात आजचा मोर्चा निघणार आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे या मोर्चात सहभागी होणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे हे सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मुंबईकरांना संबोधित करणार आहेत. मुंबई महापालिकेत वर्षभरापासून नगरसेवक नाहीत. मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हातात आहे आणि त्यामुळेच मुंबई महापालिकेच्या प्रशासकीय कारभारात हजारो कोटी रुपयांचे घोटाळे होत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola