खासदार नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांना स्थगिती
प्रशांत कदम, एबीपी माझा
Updated at:
22 Jun 2021 05:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमरावतीच्या अपक्ष आमदार नवनीत कौर राणा यांना मंगळवारी सर्वोच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. राणा यांनी सादर केलेलं जातपडताळणी प्रमाणपत्र अवैध असल्याचे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयानं बनावट कागदपत्रांच्या आधारे अनुसूचित जातीचा दाखला मिळवून नंतर जात वैधता प्रमाणपत्रही मिळवल्याबद्दल राणा यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावल्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे.