Superfast News : Badlapur News : चिमुकलींवर अतिप्रसंग; बदलापुरात उद्रेक

Continues below advertisement

Superfast News : Badlapur News : चिमुकलींवर अतिप्रसंग; बदलापुरात उद्रेक

ही बातमी पण वाचा

Badlapur School Case : बदलापूर प्रकरणात गुन्हा दाखल करायला 12 तास का लावले? पोलिसांकडून झालेला हा कसला हलगर्जीपणा, राज ठाकरेंचा सवाल

मुंबई : बदलापूर (Badlapur) पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार घडल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना 12 ऑगस्ट रोजी घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी पालकांना संघर्ष करावा लागला. यामुळं बदलापूरच्या नागरिकांनी आज आक्रमक भूमिका घेत सकाळपासून रेल्वे स्टेशनवर आंदोलन सुरु केलं आहे. पोलिसांनी नागरिकांना रेल्वे रुळांवरुन बाजूला होण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, नागरिकांकडून बदलापूरमध्ये(Badlapur Case) आंदोलन सुरु आहे. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन महाराष्ट्र सैनिकांनी आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत विषय लावून धरावा, असं आवाहन केलं आहे. 

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

राज ठाकरे बदलापूरच्या घटनेबाबत म्हणाले की," बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे.  मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी 12 तास का लावले ? एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा? माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे, आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांत तुमचं लक्ष असू द्या." 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram