Sunil Tatkare : रायगडवर शिवराज्याभिषेक दिन सोहळा संपन्न होत असताना सुनील तटकरे नाराज
abp majha web team
Updated at:
02 Jun 2023 04:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकिल्ले रायगडवर शिवराज्याभिषेक दिन सोहळा संपन्न होत असतानाच, सुनील तटकरेंनी नाराजीचा सूर आळवलाय. या सोहळ्यातून रायगडचे खासदार सुनील तटकरे तडकाफडकी निघून गेले. तटकरे दोन कारणांमुळे नाराज झालेत. कार्यक्रमाच्या आयोजनात त्रुटी होत्या, असा आरोप तटकरेंनी केलाय. आणि त्यांना भाषणाची संधी न दिल्यानं ते नाराज झाले. कार्यक्रम सरकारी होता, कुणाचा खासगी कार्यक्रम नव्हता, अशा शब्दांत तटकरेंनी त्यांची नाराजी व्यक्त केली.