Special Report Chhatrapati Sambhajinagar : कमांडो भरतीची बोगस जाहिरात, तरुणांची फसवणूक
बृहन्मुंबईमधील रिक्त असलेल्या पुरुष व महिला होमगार्डच्या (Home Guard) 2771 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी होमगार्ड नोंदणीचे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याची मुदत ही 10 जानेवारी 2025 रोजी रात्री 9 वाजेपर्यंत करण्यात येत आहे.
होमगार्ड नोंदणीचे माहितीपत्रक, नियम व अटी याबाबत विस्तृत माहिती व अर्ज https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1/php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी होमगार्डमध्ये सेवा करु इच्छिणाऱ्या बृहन्मुंबईतील उमेदवारांनी नोंदणीकरीता अर्ज करावा, असे आवाहन समादेशक होमगार्ड बृहन्मुंबई तथा पोलीस उपआयुक्त, सशस्त्र पोलीस ताडदेव, मुंबई यांनी केले आहे.
उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा
काही वर्षापूर्वी मुंबईतील होमगार्डच्या रिक्त जागा भरण्याच्या अनुषंगाने भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यावेळी 1500 होमगार्डची भरती करण्यात आली होती. पोलीस दलातील अपुऱ्या संख्येवर जास्तीचा ताण येत असल्यामुळं बंदोबस्ताचा भार होमगार्डवर सोपवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंहईत पुन्हा एकदा होमगार्डच्या 2771 जागांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीनेच नोंदणी प्रक्रिया करण्यात येत आहे. 10 जानेवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळं उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा असं आवाहन करण्यात आलं आहे.