Vinod Kambli Health Update | विनोद कांबळी यांच्या तब्येतीत सुधारणा, जनरल वॉर्डमध्ये हलवले

Continues below advertisement

Vinod Kambli Health Update | विनोद कांबळी यांच्या तब्येतीत सुधारणा, जनरल वॉर्डमध्ये हलवले

क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सर यांच्या स्मारकाच्या अनावरण प्रसंगाच्या निमित्तानं त्यांनी घडवलेले अनेक खेळाडू एकत्र आले होते. मुंबईतील शिवाजी पार्क परिसरातील गेट 5 नंबर जवळ स्मारकाची उभारणी करण्यात आली. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, बलविंदरसिंग सिंधू, संजय बांगर, विनोद कांबळी यांच्यासह इतर दिग्गज क्रिकेटपटू उपस्थित होते.

सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांची भेट 

या कार्यक्रमाच्या निमित्तानं राज ठाकरे आणि सचिन तेंडुलकर मंचावर गप्पा मारत उभे होते. यावेळी विनोद कांबळी देखील मंचावर आला. विनोद कांबळी मंचावर आलेला पाहताच सचिन तेंडुलकरनं राज ठाकरे यांच्यासोबतची चर्चा थांबवली. राज ठाकरेंच्या परवानगीनं सचिन तेंडुलकरनं विनोद कांबळी जवळ जात त्याची विचारपूस केली. सचिन तेंडुलकर सोबतच्या भेटीनं विनोद कांबळी देखील आनंदी  झाल्याचं पाहायला मिळाली. दोघांनी गळाभेट घेतल्याचं पाहायला मिळालं.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram