Special Report BJP Delhi : भाजप एका व्यक्तीवर अवलंबून नसेल, पक्षश्रेष्ठींची भूमिका
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report BJP Delhi : भाजप एका व्यक्तीवर अवलंबून नसेल, पक्षश्रेष्ठींची भूमिका राज्यातल्या महायुतीच्या विशेषतः भाजपच्या सुमार कामगिरीचं दिल्लीत मंथन झालं. राज्यात भाजपच्या सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासोबत राज्यातल्या नेतृत्वाला कानपिचक्या देण्याचं कामही दिल्लीत वरिष्ठ नेतृत्वाने केलं... काय घडलं नेमकं दिल्लीत पाहूया महाराष्ट्रात 40 प्लसचा नारा देणाऱ्या भाजपला दोन आकडी संख्याही गाठता आली नाही. लोकसभेतल्या या सुमार कामगिरीवर अमित शाह आणि जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील प्रमुख भाजप नेत्यांची शाळा घेण्यात आली. कोणा एकाच व्यक्तीवर पक्ष अवलंबून राहणार नाही असं फर्मानही देताना दिल्लीश्वरांनी विकेंद्रीकरणाचे संकेत दिलेत. महाराष्ट्रात भाजपमध्ये कोणताही समन्वय नाही सामूहिक जबाबदारी घेत चुका सुधारा पक्ष एका व्यक्तीवर अवलंबून नसेल कोअर कमिटी एकत्रितपणे पक्ष चालवेल सर्वच नेत्यांना सक्रिय व्हावं लागेल आतापासून विधानसभेच्या तयारीला लागा, उमेदवार तयार करा कुठे कशी मत मिळाली यावर सविस्तर चर्चा झाली विधानसभेचा रोडमॅप यावर चर्चा झाली. मित्र पक्षांसोबत कशा रीतीने निवडणूक काढता येईल याचा रोडमॅप आम्ही विचार केला आहे. लवकरच घटक पक्षांसोबत कसं पुढे जाता येईल यावर आम्ही चर्चा करणार आहोत लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत फडणवीसांनी सरकारमधून मोकळं करण्याची विनंती केली. यावर अंतिम निर्णय झाला नसला तरी तूर्तास फडणवीसांच्या खांद्यावरचा उपमुख्यमंत्रीपदाचा भार कायम असणार आहे.