Solapur : मंगळवेढ्यात वाळू माफियांनी पोलीस कर्मचाऱ्याला चिरडलं, पोलिसाचा जागीच मृत्यू ABP Majha
सुनील दिवाण, एबीपी माझा
Updated at:
25 Sep 2021 04:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथे बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या माफियांनी कारवाईसाठी आलेल्या गणेश सोनलकर या पोलीस कर्मचाऱ्याला उडवले. यात पोलिसाचा जागीच मृत्यू झाला आहे. भीमा नदीच्या सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपशावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसाला चिरडण्यापर्यंत वाळू माफिया उद्दाम बनले असल्याचं समोर आलं आहे.