सिंदखेडराजा येथील राजे लखोजी जाधव राजवाड्यासमोर अज्ञातांनी बसवला शिवारायांचा पुतळा
abp majha web team
Updated at:
09 Jan 2022 03:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ जन्मस्थळ असलेल्या राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यासमोर रात्री दोन वाजेदरम्यान अज्ञात व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बिना परवानगी बसविल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे राजमाता जिजाऊ जन्मोत्सव दोन दिवसांवर आलेला असताना हा पुतळा प्रशासनाची कुठलीही परवानगी न घेता नगर परिषदेच्या जागेत रात्री उशिरा बसविल्याने आता नगर परिषद प्रशासन जाग झालं आहे. इतका मोठा अश्वारूढ पुतळा बसविताना कुणाला दिसलं कसं नाही नाही म्हणून आश्चर्य व्यक्त होत आहे. आता नगर परिषदेकडून अज्ञात व्यतींविरोधात पोलीसात तक्रार देण्यात येत असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी दिली तर तक्रार प्राप्त होताच यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक केशव वाघ यांनी दिलीये. दरम्यान या भागात पुतळा बसविल्याची माहिती परिसरात पसरताच या चौकात गर्दी झाली , शिवसेनेचे माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनी या पुतळ्याची पूजाही केली आहे.