Pratap Sarnaik vs Jitendra Awhad : जिथे रेव्ह पार्ट्या सुरु आहेत तिथे कारवाई झालीच पाहिजे
Pratap Sarnaik vs Jitendra Awhad : जिथे रेव्ह पार्ट्या सुरु आहेत तिथे कारवाई झालीच पाहिजे
हेही वाचा :
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला (Vote Counting) सुरुवात झाली आहे. या मतमोजणीत दोन वेळेस जास्त मतपत्रिका आढळून आल्या आहेत. एकूण पाच बोगस मतपत्रिका जास्त आढळल्याने शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena Thackeray Camp) यावर आक्षेप घेण्यात आला. आता या प्रकरणाची शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दखल घेतली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील पाचव्या टप्प्यात मुंबईत मतदान सुरु असताना उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोग आणि भाजपवर गंभीर आरोप केले होते. या पत्रकार परिषदेत ज्या ज्या भागात शिवसेना ठाकरे गटाचे मतदान जास्त आहे, त्या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया अतिशय संथ गतीने पार पडत असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यातच आता नाशिक शिक्षक मतदारसंघात जास्त मतपत्रिका आढळल्याची माहिती मिळत उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली आहे.