
Sharad Pawar : भीमा कोरेगाव प्रकरणी जे. एन. पटेल आयोगासमोर शरद पवारांची साक्ष, काय विचारले प्रश्न?
Continues below advertisement
Bhima Koregaon Case : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) भीमा कोरेगाव प्रकरणी जे. एन. पटेल आयोगासमोर चौकशीसाठी हजर राहिले आहेत. याप्रकरणी त्यांना आयोगानं आणि इतर पक्षांच्या वकीलांनी काही प्रश्न विचारले. त्यावेळी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंना तुम्ही ओळखता का? असा प्रश्न आयोगानं त्यांना विचारला. त्यावेळी मी त्यांच्याबद्दल पेपरमध्ये वाचलंय, असं उत्तर शरद पवारांनी दिलं. तसेच, यांसारख्या अनेक प्रश्नांना शरद पवारांनी थेट उत्तरं दिली.
Continues below advertisement