Pune Car Accident : प्रत्येक बार आणि पबवर असणार नजर, पुण्यातील प्रकारानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय

Continues below advertisement

पुणे : पुण्यात 19 मे रोजी झालेल्या अपघातावरुन मोठा वादंग निर्माण झाला आहे. अल्पवयीन मुलगा, वडिल आणि आजोबांसह डॉक्टरांना अडटक करण्यात आली आहे. त्यासोबतच बार मालक, बार टेंडर यांनादेखील अटक करण्यात आली आहे. तर दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या अपघातानंतर पब आणि बारचा मुद्दा चर्चेत आला. त्यामुळे पुण्यातील मोठे बार आणि पब बंद करण्यात आले. पुण्यातील या कारवाईनंतर आता मुंबईतील पब आणि बारवरदेखील मोठी कारवाई करण्यात येत आहे. मुंबई महापालिका, राज्य उत्पादन शुल्क आणि मुंबई पोलिसांनी संयुक्तरित्या शहरातील बार आणि पबची झाडाझडती सुरू केली आहे.

शनिवारी,रविवार आणि सोमवारी पोलिसांनी  मुंबईत 50 ठिकाणी छापेमारी केली.या छापेमारीत मुंबईतील पवई परिसरात एका बार आणि पबवर पोलिसांनी छापेमारी केली असता. चौकशीत एका अल्पवयीन मुलाला मद्य दिल्या प्रकरणी बारच्या मॅनेजर आणि वेटरवर गुन्हा दाखल केला आहे. टेक बहादूर आयर (47) आणि वेटर विकास राणा (30) अशी या दोन आरोपींची नावे आहेत पवई पोलिसांनी दोघांवर बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा, 2015 च्या कलम 77 अंतर्गत गुन्हा नोंदवला असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

बारवरील पोलिसांनी केलेल्या कारवाईचा तपशील पोलिसांच्या संबंधित परवाना विभाग आणि उत्पादन शुल्क विभागाकडे पाठविला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुंबईतील अनेक भागात अनधिकृत पब आणि बार आहे. मुंबईतील अनेक परिसरात मोठ मोठ्याने धिंगाणा सुरु असतो. हाच धिंगणा थांबवण्यासाठी आणि पुण्यात घडलेल्या प्रकराची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी मोठी खबरदारी घेतली जात आहे. आतापर्यंत 5 बारमधील अनधिकृत बांधकाम तोडले आहे. बाक अनधिकृत बारवर देखील पोलिसांची आणि महापालिकेची करडीनजर असणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram