City 60 Super Fast News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवाग आढावा : 31 May 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमध्य रेल्वेवरील प्रवाशांना मोठा दिलासा, मुंबईकडे जाणाऱ्या स्लो लाईनवरचं काम वेळेआधीच पूर्ण, मुंबईकडे जाणाऱ्या स्लो लाईनवरून वाहतूक सुरू.
मुंबईतल्या मेगाब्लॉकमुळे पुण्यातून मुंबईला जाण्यासाठी ४० जादा एसटी बसेस, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरील फलाटांच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द, रेल्वे गाड्या रद्द असल्याने एसटीवर प्रवाशांचा ताण.
मध्य रेल्वेवरील ब्लॉकमुळे बेस्टकडून अतिरिक्त बस चालवण्यात येणार, सीएसएमटी ते भायखळा, धारावी, दादर, कुलाबा ते वडाळा स्थानकासह इतर ९ मार्गांवर ५५ अतिरिक्त बसेस धावणार.
मुंबईत मध्य रेल्वेवर आजपासून रविवार दुपारपर्यंत विशेष मेगाब्लॉक, लोकलच्या एकूण ९३० फेऱ्या रद्द.
आज ठाणे स्थानकात ६३ तासांचा ब्लॉक. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळ कुर्ला नेहरूनगर, परळ आणि दादर स्थानकातून ठाण्यासाठी ५० जादा गाड्या चालवणार. एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाची माहिती
ब्लॉकदरम्यान सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होमची मागणी
मध्य रेल्वेवर सुरू झालेल्या मेगाब्लॉकमुळे कुर्ला स्थानकावर गर्दी, लोकल फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशी हैराण.
मेगाब्लॉकमुळे राज्य निवडणूक आयोग कर्मचारी अधिकाऱ्यांना मुभा, कर्मचाऱ्यांना कार्यालयात येणं कठीण, त्यामुळे जे कर्मचारी गैरहजर राहतील त्यांची रजा कापली जाणार नाही, आज सुट्टी झाल्यास ती इतर दिवशी भरून काढावी लागणार.