Sanjay Raut Full PC : लाडक्या बहिणींनाही दहा हजार रुपये द्या : संजय राऊत : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Raut Full PC : लाडक्या बहिणींनाही दहा हजार रुपये द्या : संजय राऊत : ABP Majha राज्य सरकारच्या योजनेवरून लाडकी बहिण योजनेवरून शिवसेना उद्धव ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) जोरदार निशाणा साधलाय. लोकसभेतील (Lok Sabha Election) पराभवानंतर राज्य सरकारला लाडका भाऊ आठवला का असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय. दरम्यान बहिण घर सांभाळते तीचं दीड हजारात काय होणार असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय. दरम्यान यावेळी बोलताना संजय राऊतांनी छगन भुजबळांवरही निशाणा साधलाय. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. लाडकी बहिण योजनेवर संजय राऊतांनी टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले,लोकसभेतील पराभवानंतर यांना लाडका छोटा भाऊ आठवू लागला आहे. त्यांना मिळणाऱ्या मदतीबद्दल आमचा विरोध नाही. खर तरं बहिणीला जास्त मदत मिळायला हवी. बहिण घर चालवत असते, स्त्री पुरूष समानता असायला हवी. दिड हजारात काय होतंय?, किमान 10 हजार तिलाही द्यायला हवेत. परवा सगळे लाडके भाऊ भरतीकराता जमा झालेले पाहायला मिळाले. भावांची बेरोजगारी आधी दूर करायला हवी .