Sanjay Raut Full PC : सीमाप्रश्नी आग लावण्याचं काम, विधानसभेत बोम्मईंविरोधात ठराव मंजूर करावा

Continues below advertisement

Sanjay Raut : चीनने जगभरात घुसखोरी सुरु केली आहे. त्याच पद्धतीनं कर्नाटक  (Karnataka) राज्य महाराष्ट्रातील (Maharashtra) सांगली आणि सोलापुरात घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (CM Basavaraj Bommai) हे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नी आग लावण्याचं काम करत असल्याचे राऊत म्हणाले. दिल्लीत गृहमंत्री अमित शाह (Minister Amit Shah) यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काय ठरलं हे बोम्मई मानायला तयार नाहीत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची तोंड गप्प असल्यामुळं बोम्मई जास्त बोलत असल्याचे राऊत म्हणाले. त्यामुळं महाराष्ट्राच्या विधानसभेनं बोम्मई यांच्या विरोधात ठराव करुन तो मंजूर केला पाहिजे असेही राऊत म्हणाले. संजय राऊत चीनचे एजंट असल्याचे वक्तव्य बोम्मई यांनी केलं होतं. त्यांच्या या टीकेला राऊतांनी आज दिल्लीत प्रत्युत्तर दिलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram