Sanjay Raut Full PC Mumbai :अमित शाहांनी त्याग आणि बलिदानावर बोलणं हा त्या शब्दांचा अपमान -संजय राऊत

Continues below advertisement

Sanjay Raut Full PC Mumbai :अमित शाहांनी त्याग आणि बलिदानावर बोलणं हा त्या शब्दांचा अपमान -संजय राऊत

महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चांसदर्भात एक चर्चा समोर आली आहे. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद देताना आमच्या माणसांनी त्याग केल्याची आठवण करुन दिल्याची माहिती महायुतीच्या नेत्यानं एबीपी माझाला दिली होती. यासंदर्भात खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमित शाह यांना महाराष्ट्र कमजोर करायचा होता असा आरोप देखील संजय राऊत यांनी केला. भाजप नेत्यांनी बलिदान, त्याग यावर बोलणं हा त्या शब्दांचा अपमान असल्याचं देखील राऊत म्हणाले. 

अमित शाह अन् भाजपला महाराष्ट्रावर सूड घ्यायचा होता : संजय राऊत

अमित शाह यांनी जागा वाटपाच्या चर्चांमध्ये एकनाथ शिंदेंना भाजपनं मुख्यमंत्रीपद देताना त्याग केल्याची आठवण करुन दिल्याची माहिती समोर आली होती. यावर विचारलं असता संजय राऊत म्हणाले की अमित शाह आणि भाजपनं त्याग केला नाही. अमित शाह यांना महाराष्ट्रावर सूड घ्यायचा होता. शिवसेना त्यांना तोडायची होती. महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्ला करायचा होता, त्यासाठी शिंदे आणि त्यांच्या लोकांचा वापर केला असा आरोप राऊत यांनी केला. 

भाजप नेत्यांना त्याग, बलिदान शब्द शोभत नाहीत 

भाजप नेत्यांना त्याग, बलिदान हे शब्द शोभत नाही. त्या नेत्यांनी बलिदान, त्याग शब्द बोलणं हा त्या शब्दांचा अपमान आहे, अशी टीका देखील संजय राऊत यांनी केली. अमित शाह यांना महाराष्ट्र कमजोर करायचा होता, उद्धव ठाकरे,शरद पवारांचा पक्ष त्यांना तोडायचे होते. यासाठी त्यांच्या लोकांना जुळवून घ्यायला सांगितलं होतं, असं संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्राची लूट केली त्याला त्याग म्हणतात का असा सवाल राऊत यांनी केला.  बावनकुळेंनी 50 कोटींची जमीन कवडीमोल भावात ओरबडली हा त्याग आहे का? त्याग बलिदान हे शब्द त्यांच्या तोंडी शोभत नाही, असंही राऊत म्हणाले.शिंदे पवार यांचा खेळ भाजप या निवडणुकीत संपवेल.भाजप हा मदारी आहे, ही सगळी माकडं आहेत,या सगळ्या माकडांना आपल्या तालावर नाचवणार आणि सोडून देणार असंही संजय राऊत म्हणाले.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram