ABP Majha Headlines : 9 AM : 17 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 9 AM : 17 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

अजित पवार गटाचे दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासात दररोज नवीन माहिती समोर येताना दिसत आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या तीन मारेकऱ्यांनी वांद्रे (Bandra) येथील खेरवाडी जंक्शनच्या परिसरात बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबरला हत्या केली होती. सिद्दीकींच्या (Baba Siddique Murder) हत्येचा कट कसा रचण्यात आला, याविषयी पोलिसांन एक-एक करुन धागेदोरे सापडत आहेत. अशातच आता यंदाच्या मे महिन्यात घडलेला प्रकार मुंबई पोलिसांच्या लक्षात आला आहे. मे महिन्यात बाबा सिद्दीकी यांच्या निवासस्थानी गोळीबार झाल्याची अफवा पसरली होती. या अफवेमागील सूत्रधार कोण आहे आणि त्याचा बाबा सिद्दीकी यांच्या हत्येशी काही संबंध आहे का, याचा शोध आता मुंबई पोलिसांनी सुरु केला आहे.

मुंबई पोलीस दलातील एका बड्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार,  21 मे रोजी बाबा सिद्दीकी यांच्या निवासस्थानी गोळीबार झाल्याची बातमी पसरली होती. त्यानंतर पत्रकारांनी पोलिसांना फोन करायला सुरुवात केली. बाबा सिद्दीकींच्या घरावर गोळीबार (Siddique gun firing) झालाय, ते सुरक्षित आहेत का, असे प्रश्न पत्रकार पोलिसांना विचारत होते. अनेक पत्रकारांचे फोन आल्यानंतर पोलिसांनी खरोखरच काही घडले आहे का, हे तपासण्यासाठी एक पथक बाबा सिद्दीकी यांच्या घराच्या दिशेने धाडले. त्यानंतर बाबा सिद्दीकी यांनाही संपर्क करण्यात आला. तेव्हा त्यांनी मी लंडनमध्ये असून सुरक्षित असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे ही बातमी अफवा असल्याचे स्पष्ट झाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram