Rrahul Kanal : आरोप सिद्ध करा, अन्यथा राजीनामा द्या, राहुल कनाल यांचं संजय राऊतांना आव्हान

Continues below advertisement
Rrahul Kanal : आरोप सिद्ध करा, अन्यथा राजीनामा द्या, राहुल कनाल यांचं संजय राऊतांना आव्हान
मुंबई
 : 
खिचडी घोटाळा झाला आहे, त्यामध्ये ऑन रेकॉर्ड नाव आली आहेत. आमची नाव आली तर आम्ही दोघेही राजकारनाचा त्याग करायला तयार आहे. पक्ष सोडला तर चोर आणि सोबत असल्यावर का मांडीत घेऊन बसतात का?, असा हल्लाबोल शिवसेना शिंदे गटाचे नेते राहुल कनाल यांनी केला.  आरोप खोटे ठरल्यास राजीनामा देणार का ? असा सवाल यावेळी राहुल कनाल यांनी संजय राऊतांना (Sanjay Raut) विचारला. शिवसेना युवा सेना सरचिटणीस राहुल कनाल (rahul kanal) आणि अमेय घोले यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांना उत्तर दिले. यावेळी त्यांनी पुरावेही दाखवले. सुरु तुम्ही केलं, संपवणार मी, असेही यावेळी ते म्हणाले. अमेय घोले, वैभव थोरात, राहुल कनाल खिचडी घोटाळ्याचे लाभार्थी असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. आमच्यावर केलेले आरोप सिद्ध करा, नाहीतर मग राजकारणातून राजीनामा द्या, असे राहुल कनाल यांनी संजय राऊत यांना चॅलेंज केले.
 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram