Ajit Pawar On Vanchit Aghadi : वंचित बहुजन आघाडीशी चर्चा करण्यास तयार- अजित पावर

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती होणार का अशी चर्चा सुरु आहे... त्यातच आता राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी एक महत्त्वाचं विधान केलंय... ते म्हणजे समविचारी पक्षांनी एकत्र यावं ही राष्ट्रवादीची देखील भूमिका आहे... आणि त्यादृष्टीनं वंचितसोबत चर्चेसाठी तयार आहोत... असं विधान केलंय... त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून वंचितला सोबत येण्यासाठी गळ घालण्याचा प्रयत्न सुरु आहे का?, असा आता प्रश्न उपस्थित होतोय... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola