BMC CAG: कॅगकडून मुंबई मनपातील व्यवहाराची चौकशी सुरू; कोणते व्यवहार रडारवर?
BMC CAG: मुंबई महापालिकेतील 12 हजार कोटींच्या व्यवहाराची चौकशी कॅगकडून सुरू करण्यात आली आहे. आज कॅगचे आठ ते 10 अधिकारी मुंबई महापालिकेच्या (BMC) मुख्यालयात दाखल झाले. विविध विभागांच्या व्यवहारांच्या कागदपत्रांची त्यांनी मागणी केली असल्याची माहिती आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी शिवसेना ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी राज्य सरकारने कोरोना काळातील मुंबई महापालिकेच्या व्यवहाराची कॅगकडून (CAG) चौकशी करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा सुरू आहे.