Pune Drugs : पुण्यातील तरुणाई ड्रग्सच्या नशेत? रमेश परदेसींकडून हादरवून टाकणारा व्हिडीओ समोर

Continues below advertisement

पुणे : शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक  (Pune Drugs)  आणि राज्याला हादरवून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे. पुण्यातील तरुणाई नशेत टुल्ल असल्याचं या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. अभिनेते रमेश परदेसी यांनी हा व्हिडीओ समोर आणल्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर आज या टेकडीवर नेमकं काय घडलं? हे स्वत: सांगितलं आहे.

रमेश परदेसींनी सांगितला संपूर्ण प्रकार....

रमेश परदेसींनी एबीपी माझाशी बोलताना हा संपूर्ण प्रकार सांगितला.  ते म्हणाले की,     गेली अनेक वर्ष वेताळ टेकडीवर पळायला येतो. पळत असताना अचानक दोन तरुणी टेकडीवर झोपलेल्या दिसल्या. एक तरुणी झाडाला टेकून होती आणि एक तरुणी खाली झोपलेली होती.  त्या तरुणींच्या जवळ जाऊन बघितल्यावर त्यांच्या तोंडाला फेस आल्यासारखा दिसला. हे पाहताच मी दोन मुलांना आवाज दिला आणि त्यांची मदत घेऊन मोकळ्या हवेत घेऊन आलो. त्यानंतर त्यांना काय होत आहे, हे आमच्यातील कोणालाही कळत नव्हतं. आम्ही शुद्धीत असलेल्या मुलीला पाणी प्यायला दिलं तर तिथे थेट उलटी केली. त्यानंतर टेकडीवर व्यायामाला आलेल्या अनेकांची मदत मागितली मात्र काहींनी मदत केली तर काहींनी दुर्लक्ष केलं. त्यानंतर धाडवे पाटील नावाच्या मित्राची कार घेतली आणि दोन्ही मुलींना दवाखान्यात दाखल केलं आणि या संपूर्ण प्रकाराची पोलिसांना माहिती दिली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram