Rajesh Tope: कोरोनाचे नियम मोडत गर्दी केल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश देणार- टोपे ABP Majha
कोरोनाचे नियम मोडत गर्दी केल्यास गुन्हे दाखल होणार आहेत. या संदर्भात पोलीस आणि प्रशासनाला आदेश देणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. तसंच मुंबई, ठाणे आणि पुण्यात ओमायक्रॉनचा धोका आणि कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे शाळा बंद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिलीय. मात्र इतर जिल्ह्यांमध्ये शाळा लगेच बंद होणार नसल्याची माहिती टोपेंनी दिलीय.