Mumbai : राज ठाकरे दिवाळीनंतर अयाेध्येत जाण्याची शक्यता, गुरु माँ कांचन गिरी यांचं निमंत्रण
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गुरु माँ कांचन गिरी आणि सूर्याचार्य काल मुंबईत दाखल झाले होते. आज त्या सूर्याचार्यांसोबत राज ठाकरे यांच्या भेटीला कृष्ण कुंजवर पोहोचले आहेत. या भेटीत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांच्यामध्ये चर्चा झाली असून हिंदुराष्ट्राच्या मजबूत बांधणीसाठी ही भट घेण्यात असल्याचं गुरु माँ कांचन गिरी यांनी म्हटलं आहे. या नंतर राज ठाकरे यांना गुरु माँ कांचन गिरी यांनी अयाेध्येत येण्याचे निमंत्रण दिले आहेत.