NIA Raids PFI Maharashtra :  देशभरात पीएफआयशी संबंधित कार्यालयावर एनआयएचे छापे, असं केलं नियोजन?

Continues below advertisement

NIA Raids PFI : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या  (PFI) कार्यालयांवर देशभरात छापेमारी (NIA Raids on PFI office) सुरू केली आहे. महाराष्ट्रातही पुणे, नवी मुंबई, भिवंडी, मालेगावसह इतर ठिकाणी छापेमारी सुरू केल्याचे वृत्त आहे. एनआयएने मध्यरात्री तीन वाजताच नवी मुंबईतील नेरूळमधील सेक्टर 23 मधील PFI च्या कार्यालयावर छापा मारला. तर, पुण्यातही कारवाई सुरू असून दोघांना ताब्यात घेतले आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे कार्यकर्ते अब्दुल कय्याम शेख आणि रझा खान या दोघांना तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे. मालेगावमधूनही एटीएसने एकाला ताब्यात घेतले आहे. औरंगाबादमधून एटीएसने चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram