Pune Tanker Accident : पुण्यात 14 वर्षीय मुलाने अनेकांना उडवलं; अपघातग्रस्ताने सांगितला थरार
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune Tanker Accident : पुण्यात 14 वर्षीय मुलाने अनेकांना उडवलं; अपघातग्रस्ताने सांगितला थरार पोर्शे अपघातानंतर (Pune Porsche Accident) आणखी एका अल्पवयीन मुलाकडून पुण्यातील (Pune Latest Updates) वानवडीत (Vadavani Accident) आणखी एक भीषण अपघात. धक्कादायक बाब म्हणजे, टँकरच्या धडकेत इतरही काहीजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. एक 14 वर्षांचा मुलगा टँकर चालवत होता. त्यानं टँकरनं अनेकांना धडक दिली. सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना, तसेच एका दुचाकीवरुन जाणाऱ्या महिलेलाही या मुलानं धडक दिली आहे. दरम्यान, सकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला. टँकर अवघ्या 14 वर्षांच्या मुलाच्या ताब्यात देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आल्यानं पुण्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पुण्यातल्या वानवडी येथे भरधाव टँकरनं सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना धडक दिली. तसेच, एका दुचाकी चालक महिलेला देखील धडक दिली. हा अपघात सकाळी साडे सहाच्या सुमारास घडला. या अपघातात काही मुले आणि महिला जखमी झाली आहे. विशेष म्हणजे या अपघाताला कारणीभूत ठरलेला टँकर अवघ्या 14 वर्षांचा मुलगा चालवीत होता. नागरिकांनी हा टँकर अडवून धरला असून चालकाला पकडून ठेवलं आहे. वानवडी येथे भरधाव टँकरनं सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना धडक दिली. तसेच, एका दुचाकी चालक महिलेला देखील धडक दिली. हा अपघात सकाळी साडे सहाच्या सुमारास घडला. या अपघातात काही मुलं आणि महिला जखमी झाली आहे. विशेष म्हणजे, या अपघाताला कारणीभूत ठरलेला टँकर अवघ्या 14 वर्षांचा मुलगा चालवीत होता. नागरिकांनी हा टँकर अडवून धरला असून अल्पवयीन चालकाला पकडून ठेवलं आहे.