Prakash Ambedkar Nagpur : दीक्षाभूमी परिसरातील पार्किंगचा प्रश्न, प्रकाश आंबेडकर म्हणतात..

Continues below advertisement

Prakash Ambedkar Nagpur : दीक्षाभूमी परिसरातील पार्किंगचा प्रश्न, प्रकाश आंबेडकर म्हणतात..

Nagpur News नागपूर : जगभरातील बौद्ध अनुयायांसह तमाम भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या नागपूरच्या दीक्षाभूमी (Dikshabhumi) येथील अंडरग्राऊंड पार्किंगला वादाचे वळण लागले आहे. दीक्षाभूमी परिसरात नागरिकांनी अंडरग्राऊंड पार्किंगला (Underground Parking) कडाडून विरोध दर्शवत परिसरात जाळपोळ केली आहे. दीक्षाभूमी परिसरात मोठ्या संख्येने जमलेल्या संतप्त जमावाने होत असलेल्या विकासकामाच्या साहित्याची तोडफोड केली आहे. तर इतर विकासकामाला आमचा विरोधनसून केवळ चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या अंडरग्राऊंड पार्किंगला आमचा कडाडून विरोध असल्याचे मत या आंदोलकांनी बोलतांना व्यक्त केली आहे.

तर दीक्षाभूमी स्मारक समितीने मनमानी करत लोकांना विश्वासात न घेता हे विकासकार्य केल्याचा आरोपही बौद्ध अनुयायी आंदोलकांनी केला आहे. आंदोलनकर्त्याचा रोष लक्षात घेता पोलीस फाटा घटनास्थळी दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

दीक्षाभूमी परिसरात बौद्ध अनुयायांचे तीव्र आंदोलन 

नागपूरच्या दीक्षाभूमी स्मारकाच्या विकासासाठी राज्य शासनाकडून 200 कोटीची वेगवेगळी विकास कामे सुरु आहे . मात्र यातील अंडरग्राऊण्ड पार्किंग प्रकल्पाला घेऊन आंबेडकरी अनुयायांनी विरोध केला आहे. अंडरग्राऊण्ड पार्किंग हि विजयादशमी दिवशी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने  धोकादायक असल्याने हे काम तात्काळ थांबवावे, अशी आंदोलकांची मागणी आहे. इतर विकास कामामध्ये सुरक्षा भिंत, तोरण द्वार, दगडी परिक्रमा पथ, मुख्य स्तूपाची डागडुजी आणि सौंदरीकरणाला आंदोलकांचा विरोध नसल्याचे देखील आंदोलकांनी सांगितले. यावेळी दीक्षाभूमी परिसरात मोठ्या संख्येने महिला पुरुष आणि शेकडो बौद्ध अनुयायी जमले आहे. परिणामी संतप्त जमावाने काही ठिकाणी साहित्याची नासधूस करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तर घटनास्थळी आता मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला असून पोलीस आंदोलकांशी संवाद साधत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सध्या केला जातोय.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram